बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ चिमुरड्यांच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूद पुन्हा बनला देवदूत

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने लॉकडाऊनच्या काळात खऱ्या खुऱ्या सुपरहिरोचं काम केलं. लॉकडाऊन काळात अनेक गरजवंतांसाठी देवदुतासारखा धावून आला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी सोनू सूद आजही मदतीसाठी तत्पर आहे. ह्रदयविकाराशी लढत असलेल्या दोन चिमुरड्यांच्या मदतीसाठी सोनू सूद पुढे सरसावला आहे. सोनू सूदने सकाळीच काही ट्विट रिट्विट करत मदत जाहिर केली आहे.

एका 22 दिवसाच्या चिमुकल्याच्या तर  1 महिन्याच्या चिमुकल्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत केली आहे. हा 22 दिवसांचा चिमुकला मुंबईतील वाडिया रूग्णालयात दाखल असून त्याला ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी 2 लाख 50 हजारांची गरज आहे. आर्थिक मदतीसाठी चिमुकल्याच्या वडिलांनी रूग्णालयाचं पत्रक ट्विट करत सोनू सूदकडे मदत मागितली आणि सोनू सूदनेही काळजी करू नका, शस्त्रक्रियेची सोय झाली आहे, असं ट्विट केलं आहे.

तर त्या 1 महिन्याच्या चिमुकल्या मुलीच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया आणि रूग्णालयाचा एकुण खर्च 3 लाखांच्या घरात जात आहे. त्या चिमुकलीच्या पालकांनीही रूग्णालयाचं पत्रक ट्विट करत सोनू सूदकडे मदत मागितली. तर सोनू सूदने ते ट्विट रिट्विट केलं आणि होऊन जाईल म्हणत मदतीचा हात पुढे केला आहे. ह्रदयविकाराशी झुंज देणाऱ्या या दोन चिमुकल्यांच्या मदतीसाठी धावून सोनू सूदने तो खरंच मसिहा असल्याचं सिद्ध केलं आहे.

या मदतीनंतर नेटकरी सोशल मीडियावर आणखी एकदा सोनू सूदचं भरभरून कौतुक करत आहेत. देवदूत बनून अनेकांच्या मदतीसाठी धावलेल्या सोनू सूदने त्याच्या या लॉकडाऊन अनुभवावरून ‘आय अॅम नो मसिहा’ हे पुस्तक लिहिलं होतं. पण लॉकडाऊन काळात आणि आता लॉकडाऊन नियमात भरपूर शिथिलता असतानाही सोनू सूद अजूनही कित्येक लोकांसाठी मसिहा म्हणूनच काम करत आहे.

 

 

 

 

 

थोडक्यात बातम्या-

“निवडणुका जवळ आल्याने दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला”

“बाबांच्या विमानात पेंग्वीनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा”

हार्दिक पांड्याच्या अडचणी वाढल्या; कस्टम विभागाकडून मोठी कारवाई

ॲमेझॉनवरून चक्क करण्यात येत होती गांजा तस्करी, असा झाला पर्दाफाश

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत 9 महिन्यानंतर मोठी घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More