बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लवकरच तो दिवस उगवेल’;संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातच आता शिवसेनेचे खासदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी संजय राऊत यांनी अनोख्या शब्दात खास शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अखंड साथ आणि अतुट नातं आहे. राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे. तो दिवस लवकरच उगवेल, असं संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे. त्याचसोबत त्यांनी स्वतःचा आणि उद्धव ठाकरे यांचा 30 सेकंदाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, ‘आता कोणी, इंद्राचं आसन जरी दिलं, तरी आम्हाला नको. आम्ही म्हटलं होतं की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर एक शिवसैनिक विराजमान होईल’, असं संजय राऊत यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

संजय राऊत हे शिवसेनेचे एक महत्वाचे नेते आहेत. तर उद्धव ठाकरे यांचे ते विश्वासू देखील आहेत. महाविकास आघाडी स्थापन करताना संजय राऊत यांचा मोठा वाटा होता. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री करण्यास देखील त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाची धुरा देखील संजय राऊत सांभाळत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. वाढदिवसानिमित्त कुणीही अभिष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये. फलक, पोस्टर्स लावू नयेत, सोशल मीडिया आणि ई-मेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

देशाच्या इतिहासात पहिलीच घटना; मतदारांना पैसे वाटल्यानं लोकप्रतिनिधी तुरूंगात

#TokyoOlympics | हाॅकी सामन्यात भारताचा 3-0 ने दणदणीत विजय

पुणे रेल्वे स्थानकाला आज 96 वर्ष पूर्ण!

पेट्रोल डिझेलची कटकट संपणार; आता कोंबड्यापासून तयार होणार बायोडिझेल

राज कुंद्राची अटक बेकायदेशीर?; न्यायालयात दाखल 2 याचिकांवर आज होणार सुनावणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More