बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कंगणाची क्रांतिकारक भगतसिंग यांच्याशी तुलना; ‘या’ अभिनेत्यानं केलं ट्विट

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केल्यावर ठाकरे सरकारवर टीका होताना दिसत आहे. यामध्ये परराज्यातील लोकही कंगणाला पाठींबा दर्शवत आहेत. अशातच दक्षिणेकडील एका अभिनेत्याने कंगणा राणावतची तुलना क्रांतिकारक भगतसिंह यांच्यासोबत केली आहे.

प्रिय कंगना, तुमच्या धैर्याला सलाम. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तुम्ही या वादात उडी मारली. हे तुमचं वैयक्तिक प्रकरण नाही. तरी देखील सरकारच्या प्रकोपाचा सामना तुम्हाला करावा लागत आहे. पण तुम्ही तितक्याच सक्षमपणे उभ्या आहात. हे खूप मोठं उदाहरण आहे. 1920 साली भगतसिंग यांनी देखील अशीच भूमिका घेतली होती, असं अभिनेता विशालने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

विशालने केलेल्या या ट्विटमुळे सोशल माध्यमांवर त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. तर काहींनी विशालच्या या मताला आपला पाठिंबा दर्शवत कंगणाची बाजू लावून धरली आहे.

दरम्यान, महापालिकेने कंगणाचे कार्यालय तोडल्यावर तिने रात्री ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्यामुळे मुंबईसह राज्यातूनही कंगणावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

घरी बसून महिलांना फावल्या वेळात काम करण्याची संधी मिळणार!

पुणे, मुंबईच्या वैद्यकीय प्रवेशाचा कट ऑफ वाढणार!

पुण्यातील तात्पुरत्या कारागृहातून 2 कोरोनाबाधित कैद्याचं पलायन

बालिका वधू फेम सुरेखा सिक्री यांची प्रकृती चिंताजन

…म्हणून कंगणाच्या आईने मानले अमित शहा यांचे आभार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More