मुंबई | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाली होती. यानंतर नवाब मलिकांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
ईडीने (ED) नवाब मलिकांविरोधात केलेल्या याचिकेची विशेष न्यायालयाने दखल घेत मलिकांना मोठा धक्का दिला आहे. ‘डि गँग’शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिक स्वत: सहभागी असल्याचं प्राथमिक तपासात दिसत आहे. त्यामुळे मलिकांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नवाब मलिक यांचे दाऊद टोळीच्या सदस्यांशी थेट संबंध होते याचे सकृतदर्शनी पुरावे दिसतायत. त्यामुळे हे पुरावे हा खटला चालू ठेवण्यासाठी पुरेसे असल्याचं निरिक्षण विशेष न्यायालयाने नोंदवलं आहे.
दरम्यान, कुर्ल्यातील गोवावाला कंपाउडच्या व्यवहारासाठी मलिक आणि दाऊदची बहिण हसीना पारकर व तिचा बॉडिगार्ड सलीम पटेल यांच्यात अनेक बैठका झाल्या असल्याचे पुरावे ईडीने आरोपपत्रात दिले होते. या आरोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने मलिकांना मोठा झटका दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
कंगनाच्या ‘धाकड’पेक्षा कार्तिकचा ‘भूल भुलैया 2’ सरस, पहिल्या दिवसाची कमाई आली समोर
‘काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे, ही भोकं शिवणार कशी?’; शिवसेनेचा प्रहार
सर्वसामान्यांना धक्क्यावर धक्के! सीएनजी पुन्हा महागलं
IANS-C Voter Survey| पंतप्रधान म्हणून आजही मोदींनाच पंसती, राहुल गांधी मात्र…
Corona Update| राज्यातील सर्वाधिक कोरोना रूग्ण मुंबईतच, वाचा आकडेवारी
Comments are closed.