बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईकर महिलांसाठी आज विशेष लसीकरण, नोंदणी न करता मिळणार दोन्ही डोस

मुंबई | गेल्या दीडवर्षापासून कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला आहे. यातच कोरोना आटोक्यात येत असलेला पहायला मिळत आहे. असं असलं तरी कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नाही. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जातोय. अशातच आता लसीकरणाविषयी मुंबईकर महिलांसाठी महत्वाची बातमी आहे.

मुंबईकर महिलांसाठी आज मोफत लसीकरण मोहिम राबवली जात आहे. ही मोफत लसीकरण मोहिम मुंबईतल्या विविध केंद्रांमध्ये आज सकाळी 10.30 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत महिलांसाठी सुरु असणार आहे. त्यामुळे आज ऑनलाईन नोंदणी न करता महिलांना लस घेता येणार आहे.

अनेक महिला लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हे विशेष महिलांसाठी लसीकरण आयोजित केलं आहे. या लसीकरण मोहिमेअंतर्गत महिलांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेता येणार आहे.

दरम्यान, कोरोना लस घेण्याबाबत अजूनही अनेक लोक नकार देताना दिसत आहेत. अशातच काही ठिकाणी लस न घेणाऱ्यासांठी लस घ्यावी म्हणून एक योजना केल्याचं समोर आलं आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून लस घेणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे.

थोडक्यात बातम्या – 

पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करणं सरकारच्याच हातात- शक्तिकांत दास

लसीचा एकही डोस न घेतलेल्या कर्माचाऱ्यांना झटका; सरकारने घेतला मोठा निर्णय

“मी सांगितलं होतं निवडून येऊ देणार नाही, मग पाडलं काय म्हणता”

आजपासून पुणे अनलाॅक; कोरोना नियमांमध्ये होणार शिथिलता

एअर इंडियाला रूळावर आणण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल- रतन टाटा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More