बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान मोदींना आपल्या मधुर आवाजात अमृता फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा! पाहा व्हिडीओ

मुंबई | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 17 सप्टेंबरला आपला 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंतप्रधान मोदींचा वाढदिवसानिमित्त भाजपकडून सेवा आणि समर्पण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहाचं आयोजन 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरातून त्यांच्यावर आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ट्विटरच्या माध्यमातून विविध विषयांवर मत व्यक्त करत असतात. अमृता यांनी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त गाणं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता यांनी शुभेच्छा देतानाचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

अमृता फडणवीस यांनी हा व्हिडीओ प्रसारित करत असताना लिहितात की, आपल्या देशातील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपात निर्णायक असा नेता मिळवला आहे. जागतिक नेतृत्व करणारा, समस्याचे निवारण करणारा, तारणहारक असा नेता मिळवला आहे. चला आपण त्यांना शुभेच्छा देऊया. संवेदनशील ह्रदयाचे कवी, नव्या भारताचे राष्ट्रपिता मा. नरेंद्र मोदीजी यांना त्यांच्याच शब्दात लिहिलेल्या गाण्यातून शुभेच्छा! असं अमृता फडणवीस यांनी लिहलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजप वेगवेगळ्या प्रकारे साजरा करत आहे, तर काँग्रेस कडून देशातील वाढलेल्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

पाहा व्हिडीओ –

 

 

 

 

थोडक्यात बातम्या –

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

सोनू सूदच्या अडचणीत वाढ???, आयकर विभागाच्या हाती लागली ‘ती’ कागदपत्रे!

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसादिवशी लसीकरणाचा नवा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ लोकांनी घेतले डोस

“शरद पवारांना राजी करण्यासाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी मागितले?”

ह्रदयस्पर्शी! ‘या’ लहानग्याची पंतप्रधान मोदींना आर्त हाक; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More