बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात आज काहीतरी होण्याची शक्यता, भाजपने आमदारांना पाठवला ‘हा’ निरोप

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळंच वळण मिळालं आहे. 12 जुलै पर्यंत 16 आमदारांच्या निलंबनाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे.

12 जुलै पर्यंत ठाकरे सरकार (Thackeray Goverment) विरोधात कधीही अविश्वास ठराव दाखल होऊ शकतो. भाजपकडे जास्त संख्या असल्याने भाजप पुन्हा सत्तेत येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. आपापल्या मतदारसंघात गेलेल्या भाजप व मित्रपक्ष आमदारांना 29 जूनपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काल शिंदे गटाने महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेत असल्यांचं पत्र राज्यपालांना दिलं. महाविकास आघाडिचे भवितव्य धोक्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णंयानंतर भाजप कार्यकारणीची बैठक झाली. यामध्ये भाजप सध्या तरी वेट अँन्ड वाॅचची भूमिका बजावत आहे. शिंदेगटाकडून अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आल्यास विचार करू असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

महाविकास आघाडी सरकार कोसळणार का?, मुख्यंमंत्री राजीनामा देणार की अविश्वास ठरावाला सामोरे जाणार?, फडणवीस सरकार परत येणार? असे अनेक प्रश्न  महाराष्ट्राला पडले आहेत. यापुढे आता राजकारणात कोणता नवा ट्विस्ट येणार पहावं लागणार आहे

थोडक्यात बातम्या

शिवसैनिकांचा संजय राठोडांना जोर का झटका, पूजा चव्हाण प्रकरणात करणार ‘हा’ धक्कादायक खुलासा

मुलाशी मैत्री केली म्हणजे मुलीची शारीरिक संबंधांना परवानगी समजू नये- उच्च न्यायालय

‘एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाहीत’, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण

म्हैसाळमधील 9 जणांच्या आत्महत्याप्रकरणी अत्यंत धक्कादायक खुलासा!

पत्रकारांच्या गोटात खळबळ उडवून देणारी बातमी, ‘या’ पत्रकाराला अटक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More