बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् भर कार्यक्रमात भाजप खासदाराने पैलवानाच्या कानशिलात लगावली

रांची | भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष आणि युपीचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh) अडचणीत आले आहेत. रांची येथील शहीद गणपत राय इनडोअर स्टेडियमवरील खेल व्हिलेजचं आयोजन करण्यात आलं होतं. नुकत्याच सुरू असलेल्या 15 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी एका तरुण कुस्तीपटूला कानाखाली मारली आहे.

15 वर्षाखालील पैलवानांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, तो वयाने मोठा होता. ज्या तरुण पैलवानाच्या कानशिलात मारली तो तरुण कुस्तीपटू यूपीचा आहे, त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आलं होतं. मात्र, त्याने स्टेजवर जाऊन स्पर्धेत खेळू द्यावं, अशी विनंती केली होती.

दरम्यान, आयोजकांनी निलंबित केल्यानंतर देखील त्याने स्टेजवर जाऊन राडा घातला. त्यामुळे खासदारांनी संतापून त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्या पैलवानाला बाहेर काढण्यात आलं. या सर्व प्रकारानंतर खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

विशेष म्हणजे ब्रिजभूषण सिंग यांना या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. तरुण कुस्तीपटूच्या कानाखाली मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपच्या तिकीटावर यूपीमधील कैसरगंजमधून लोकसभेचे खासदार आहेत. याशिवाय त्यांनी गोंडा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर राज्यात Pandemic Act लागू करा”

भारताचं टेन्शन वाढलं! ओमिक्राॅनचं शतक पुर्ण, केंद्र सरकारने दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

“अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते”, निलेश राणेंच्या दाव्याने खळबळ

झुनझुनवालांना जोर का झटका! ‘या’ शेअर्समुळे फक्त 10 मिनिटात गमावले 318 कोटी

‘भाजप आणि ममता बॅनर्जी मिळून…’; RSS च्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More