लस घेतल्याने ‘या’ कॅन्सरचा धोका कमी होणार, अदर पूनावाला यांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती
पुणे| भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने (Cervical Cancer Vaccine) अनेक महिलांचा मृत्यू होतो. भारतात हा महिलांना होणारा दुसरा घातक आजार आहे. परंतु आता एक दिलासादायक वृत्त असे आहे की, या महाभयंकर रोगाची लस भारतातच बनविली जाणार आहे. यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून सीरम इन्सिटिट्यूट ऑफ इंडिया (SII) या संस्थेला ही लस तयार करण्याची मान्यता मिळाली आहे.
भारतातील पहिल्या क्वाड्रिवेलेंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस वॅक्सिन (QHPV) चे उत्पादन लवकरच भारतात सुरु होईल आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात बाजारात उपलब्ध होईल. सीरम इन्सिटिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी (CEO) अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले, भारतात महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी प्रथमच भारतीय HPV लस बनविली जाणार आहे.
या रोगामुळे भारतात महिलांच्या होणाऱ्या मृत्यूत नक्कीच घट होईल अशी आशा आहे. SII चे अधिकारी आणि नियामक प्रकरणांचे संचालक, प्रकाश कुमार सिंग यांनी 8 जुुलै रोजी भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल यांच्याकडे HPV लसीच्या फेज 2 आणि 3 क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्यानंतर अधिकृततेसाठी अर्ज केला होता.
दरम्यान, ही लस जनसामान्यांना परवडीच्या किमतीत उपलब्ध होणार आहे. शिवाय ही लस या वर्षाच्या अखेरीस बाजारात येणार असल्याचंही पूनावालांनी स्पष्ट केलं आहे.
For the first time there will be an Indian HPV vaccine to treat cervical cancer in women that is both affordable and accessible. We look forward to launching it later this year and we thank the #DCGI @MoHFW_INDIA for granting approval today.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) July 12, 2022
थोडक्यात बातम्या –
‘राजनाथ सिंह यांचा फोन आला आणि मला म्हणाले अस्सलाम वालेकुम’ -उद्धव ठाकरे
श्रीलंकेत जनक्षोभ, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देश सोडून पळाले
‘ही भूमिका अनाकलनीय’, शिवसेनेनं मुर्मूंना पाठींबा जाहीर करताच बाळासाहेब थोरातांचं ट्विट
संभाजीराजे छत्रपतींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, म्हणाले…
ईडी ना काडी, ‘या’ कारणामुळे शितल म्हात्रे शिंदे गटात सामील
Comments are closed.