औसाजवळील भीषण अपघातात एसटीचा भुगा, 20 जणांचा मृत्यू

लातूर | औसाजवळ ट्रक, एसटी आणि स्विफ्ट डिझायर गाडीला झालेल्या अपघातात एसटीचा अक्षरशः चुराडा झालाय. 20 जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

निलंग्याकडे ही एसटी जात असताना ट्रक आणि बसची समोरासमोर धडक झाल्याचं कळतंय. एक स्विफ्ट डिझायरही या अपघातात सापडली. स्थानिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलंय. 

अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय मदत देण्यात आलीय. मात्र अपघात इतका भीषण होता की मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.