पुणे | महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पुण्यासह राज्यातील एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची गैरसोय होणार आहे.
मागील मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांनी मोठ्याप्रमाणावर एसटीला लक्ष्य केलं होतं. त्यात एसटीचं मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे प्रवाशांना अर्ध्यात सोडून त्यांची गैरसोय होऊ नये, म्हणुन हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, बंददरम्यान प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेऊन, परिस्थिती आणि पोलीस संरक्षण घेऊन बस सोडण्याबाबत आगार स्तरावर निर्णय घ्यावा, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान पुणे पालिका हद्दीबाहेरील पीएमपी सेवा बंद
-मुंबईत मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद की ठिय्या; संभ्रम कायम
-नको हत्या.. नको आत्महत्या, करु रक्तदान.. देऊ जीवदान; मराठ्यांचा अनोखा उपक्रम
-नंदुरबार बंद करण्यासाठी हर्षवर्धन जाधव मध्यरात्रीच नंदुरबारमध्ये दाखल
-#MaharashtraBandh | मराठा समाजाकडून ‘महाराष्ट्र बंद’ला सुरुवात
Comments are closed.