सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 17 टक्के पगारवाढ?

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 17 टक्के पगारवाढ?

मुंबई | राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगांतर्गत सरासरी 17 टक्के पगारवाढ करण्याची शिफारस राज्य सरकारला करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यासंदर्भातील अहवाल बक्षी समितीने राज्य सरकारला सादर केला असून सरासरी 17 टक्के पगारवाढीची शिफारस करण्यात आली आहे.

एक जानेवारी 2016 पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने नविन वेतन वाढीचा लाभ 25 लाख सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

दरम्यान, ही वाढ फेब्रुवारी 2019 मध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात पडेल.

महत्वाच्या बातम्या-

-“शिवस्मारकाची उंची प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याच्या उंचीपेक्षा जास्त असावी”

-मोदी-शहांचं टेंशन वाढलं; केंद्रीय मंत्री उद्या ‘एनडीए’तून बाहेर पडणार???

-फोर्ब्ज इंडियाची यादी जाहीर; पहा कोण आहे सर्वात श्रीमंत भारतीय…

-नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत; पाहा कुणी केली भविष्यवाणी…

-राजस्थानच्या निकालाबद्दल रामदास आठवलेंचं भाकीत, पाहा काय म्हणाले…

Google+ Linkedin