बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्य सरकारमधील नेत्यांना घोटाळेभूषण, घोटाळेवैभव, घोटाळेसम्राट पुरस्कार दिले पाहिजे”

मुंबई | भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Bjp Spokeperson Keshav upadhye) यांनी महाविकास आघाडीमधील मंत्र्यांना घोटाळ्यांवरून पुरस्कार देणार असल्याचा टोला लगावला आहे. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घोटाळेरत्न पुरस्कार देिले पाहिजेत, असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला आहे.

“राजेश टोपे यांच्या आरोग्य खात्यप्रमाणेच इतर खात्यातील घोटाळेही उघडकीस येत आहेत. अशा खातेप्रमुख मंत्र्यांनाही विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये घोटाळेभूषण, घोटाळेवैभव, घोटाळेसम्राट अशा पुरस्कारांचा समावेश आहे. घोटाळ्यांच्या मालिकेतील सर्वोच्च पुरस्कार जीवन गौरव पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहे,” अशा चिमटाही उपाध्ये यांनी काढला आहे.

“जीवन गौरव पुरस्कारासाठी जनतेचा कौल घेण्यात येणार आहे. सरकारमधील घोटाळेबाजांच्या कर्तबगारीची दखल घेऊन पुरस्कार देण्याची ही पहिलीचं वेळ आहे. या पुरस्कार सोहळ्यास मानकऱ्यांनी उपस्थित राहावे. परंतु घोटाळ्यांचा ताण लक्षात घेता ते उपस्थित राहू शकले नाहीत, तर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे,” असंही उपाध्ये म्हटले आहेत.

दरम्यान, घोटाळेबाज सरकारला पुरस्कार देण्याची घोषणा केशव उपाध्येंनी केली आहे. शिवाय महाविकास आघाडीतील मंत्री उपस्थित राहू शकले नाही तर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना पुरस्कार देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता उपाध्ये खरचं नेत्यांना पुरस्कार देणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सलमानच्या वाढदिवसाला जेनेलियाचा तुफान डान्स; पाहा व्हिडीओ

‘कोणीही अतिशहाणपणा शिकवू नये’; संजय राऊतांचा राणेंवर हल्लाबोल

‘…तर ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते’; आदित्य ठाकरेंचा सूचक इशारा

लेकाच्या पाठोपाठ आता बापही अडचणीत, नारायण राणेंना पोलिसांकडून नोटीस

‘राजकारणाच्या हमाम मे सब नंगे है’; संजय राऊतांचा हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More