बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई पोलिसांना सरकारकडून फक्त 750 रूपयांची दिवाळी भेट!

मुंबई | कोरोना महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस पोलिसांनी राज्यात जागता पहारा दिला. कोरोना सारख्या काळात अत्यावश्यक सेवांमध्ये डॉक्टरांचा आणि पोलिसांचा समावेश आहे. त्या पोलिसांची राज्य सरकारने खिल्ली उडवली आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना भरघोस दिवाळी भेट दिल्याचं पहायला मिळत आहे. पण सरकारने पोलिसांची चेष्टा केल्याचं पहायला मिळत आहे.

दिवाळीच्या काळात आपलं कर्तृत्व चोखपणे पार पाडणाऱ्या मुंबई पोलिसांना राज्य सरकारने मात्र केवळ 750 रूपये भेट जाहीर केली आहे. राज्यातील अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या रक्कमेची दिवाळी भेट जाहीर केली आहे. पण पोलिसांना मात्र तुटपूंजी मदत जाहीर केली आहे. यामुळे पोलिसांमध्ये नाराजीचं वातावरण पहायला मिळत आहे.

मुंबई पोलिसांना दिवाळी भेटीच्या निमित्ताने सबसिडी कँटिनमध्ये त्याच्या नावे डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 750 रूपये इतक्या शुल्लक रक्कमेची खरेदी विनामुल्य करता येणार आहे. ही भेट पोलिसांसाठी असणाऱ्या संचित निधीमधून करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या निर्णयावर अनेकजण नाराज असल्याचं दिसून येतंय.

दरम्यान, जर पोलिसांनी ठरलेल्या रक्कमेच्या वरती खरेदी केली तर त्यांना आपल्या खिशातून भरावे लागणार आहेत. या बाबतचं पत्रक मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी जारी केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

पीएफ खातेदारांसाठी मोठी बातमी! ऐन दिवाळीपूर्वी मिळणार तब्बल ‘इतके’ टक्के व्याजदर

‘आता तरी सरकारला जाग येणार का?’;’त्या’ घटनेवरून प्रविण दरेकरांचा संतप्त सवाल

“चीनवर बोलणारे सर्वज्ञानी संजय राऊत पंढरपूरवर गप्प का?”

सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा; वाचा आजचा सोने-चांदीचा ताजा भाव

“अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचं आमचं ध्येय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More