Top News विदेश

धक्कादायक! भारतात गेल्या 50 वर्षात तब्बल 4.5 कोटी मुली झाल्या गायब

नवी दिल्ली | देशातील महिलांच्या अत्याचारात दिवसागणिक वाढ असल्याचं पहायला मिळत असताना आता संयुक्त राष्ट्राचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. भारतात ५० वर्षांच्या काळात तब्बल ४.५ कोटी मुली गायब झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

State of World Population 2020 हा अहवाल ‘संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी’कडून नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालात जगभरातील बेपत्ता मुलींचा आढावा घेण्यात आला आहे. या मुलींना ‘मिसिंग फिमेल्स’ असं म्हटलं जातं.

गर्भपात किंवा जन्मानंतर छळ झाल्यावर मृत्यू झालेल्या मुलींची आकडेवारीचा समावेश यात करण्यात आला आहे. चीन व भारत या देशांमध्ये या मुली गायब होण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, मुलींच्या गायब होण्यामुळे या देशांना अनेक गंभीर सामाजिक प्रश्नांना तोंड द्यावं लागू शकतं. जगभरात दरवर्षी तब्बल १२ ते १५ लाख मुलींचे गर्भपात केले जात असल्याची धक्कादायक आकडेवारी देखील या अहवालातून समोर आली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद

महत्वाच्या बातम्या-

लालबागच्या राजाचा यंदा उत्सव नाही तर 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मादान!, मुख्यमंत्री म्हणतात…

आम्हाला सत्काराची अपेक्षा नाही, पण तिरस्कार तरी करु नका- रामदेव बाबा

आषाढी एकादशीनिमित्त अमिताभ बच्चन यांनी दिल्या मराठीमध्ये शुभेच्छा, म्हणाले….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या