Top News आरोग्य कोरोना पुणे

पुण्यात कोरोनाचं थैमान थांबेना; गेल्या २४ तासातील आकडेवारीही चिंताजनक

पुणे | देशासह राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. मात्र गेल्या काही दिवसांपासून रूग्ण उपचारानंतर बरं होण्याच्या प्रमाणात बर्‍यापैकी वाढ झालेली दिलीये. दरम्यान, पुण्यात गेल्या 24 तासात 1464 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात आज दिवसभरात 1909 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. पुण्यात 42 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये २१ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

सध्या पुणे शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 11679 एवढी आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे तब्बल 97498 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. या बरं झालेल्या रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात 22,543 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 10,60,308 झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण 2,90,344 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

महत्वाच्या बातम्या-

गुंडागर्दी करणं शिवसेनेची सवय आहे- रामदास आठवले

कंगणा राणावतने घेतली राज्यपालांची भेट

कट रचून सुशांतची हत्या करण्यात आली- सुब्रमण्यम स्वामी

“मुंबई असो कि महाराष्ट्र… एकच ब्रँड छत्रपती शिवाजी महाराज”

महाराष्ट्रात गुंडाराज!; लिलावात सहभागी झाल्यानं ‘जय हिंद’च्या माने-देशमुखांवर जीवघेणा हल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या