मुंबई | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही धमकी अहमदनगरमधील एका व्यक्तीने दिल्याची प्राथमिक माहिती आहे.
रूपाली चाकणकर यांना याअगोदरही अशा प्रकारच्या धमकीचे फोन आले होते. रूपाली चाकणकर यांनी सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर तक्रारींची तात्काळ दखल घेताना दिसतात. अशातच धमकीचे फोन आल्याने खळबळ माजली आहे.
थोडक्यात बातम्या-
नारायण राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; पुन्हा नोटीस जारी
“सोनिया गांधींच्या सांगण्यावरून मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला पण…”
‘शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळत असल्याने केंद्र सरकारला पाहवत नाही’
मोठी बातमी ! राज ठाकरेंवर 1 जूनला शस्त्रक्रिया होणार
उदयनराजेंनी रस्त्यावरील मुलीकडून सगळी पुस्तके विकत घेतली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Comments are closed.