बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘समाजात गैरसमज पसरवणारी वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत’; जयंत पाटील आक्रमक

सांगली | महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि मृत्यु होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी कोरोनाने मृत्यू होणारी लोकं जगण्याचा लायकीची नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याबरोबरच मास्क वापरण्याचा सिद्धांत कोणत्या शहाण्याने काढला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. या सर्व प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचे संकेत दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व नेते जयंत पाटील यांनी या प्रकरणात आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

कोरोनाचं संकट घालवण्यासाठी महाराष्ट्र सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे त्यातच समाजाची दिशाभूल करणारी अशी वक्तव्य अयोग्य असल्याचं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. तसेच कोरोनासारख्या महामारीच्या संकटात समाजात गैरसमज पसरवणारी वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत असा इशाराही त्यांनी संभाजी भिडे यांना दिला आहे.

राज्य सरकार सध्या कोरोनाच्या संकटाशी लढत आहे अशा वेळेला आंबे खाल्ल्यावर मुलं होतात अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून गैरसमज करणारी विधानं होत असल्यास ती चुकीची असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं, तसेच या सर्वांमुळे संकटाचे गांभीर्य कमी होऊन सरकार आणि समाजाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये बाधा निर्माण होत असल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

जयंत पाटील हे रविवारी सांगली येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी अशी वक्तव्यं कायद्याच्या दृष्टीने तपासून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता संभाजी भिडे यांच्यावर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

वाझेंच्या अडचणीत वाढ; टीआरपी घोटाळ्यात ‘इतक्या’ लाखांची लाच घेतल्याचा आरोप

पुण्याला PM केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर निघाले खराब; अधिकाऱ्याने अजित पवारांकडे केली तक्रार

“प्रकाश जावडेकर दिल्लीत बसुन जे ज्ञानामृत देत आहेत त्याची महाराष्ट्राला गरज नाही”

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा!

धक्कादायक! महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये एकही व्हेंटीलेटर बेड शिल्लक नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More