‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ साकारताना मराठी भाषेचा विसर

गांधीनगर | ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ साकारताना गुजरात प्रशासनाला मराठी भाषेचा विसर पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरुन आता टीका सुद्धा सुरु झाली आहे. 

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर एक पांढऱ्या रंगाचा फलक बसवण्यात आला आहे. या फलकावर 10 विविध भाषांमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ नाव लिहिण्यात आलं आहे. 

देश-विदेशातील या भाषांमध्ये मराठीला मात्र स्थान दिलं नसल्याचं समोर आलं आहे. गुजरात आणि महाराष्ट्र शेजारी राज्य असूनही गुजरात प्रशासनानं मराठीला अव्हेरलं आहे. 

दरम्यान, मराठी शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारला आहे तर मराठमोळे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्याकडे आजच्या कार्यक्रमाचं नियोजन होतं.

statue marathi 670x443 - 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' साकारताना मराठी भाषेचा विसर

महत्त्वाच्या बातम्या-

-तनुश्री विरोधात राखीचा चार आण्यांचा मानहानीचा दावा!

-‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’चं सौंदर्य़ आणि वैशिष्ट्ये

-निर्लज्ज, खोटारडं आणि बेमालूम भ्रष्टाचारी सरकार आजपर्यंत पाहिलं नाही!

-इंदिरा गांधी असत्या तर आज मी काँग्रेस पक्षात असतो- शत्रुघ्न सिन्हा

-…तर खैरेंनी पक्षातून बाहेर पडावं; हर्षवर्धन जाधवांचा चंद्रकांत खैरेंवर हल्लाबोल

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या