महाराष्ट्र मुंबई

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या ट्रक आणि टेम्पोंबाबत सरकारने घेतला हा निर्णय

Loading...

मुंबई | अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सध्याच्या आपात्कालीन परिस्थितीत करण्यासाठी मालवाहतूक करणारे ट्रक आणि टेम्पो यांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून राज्याच्या परिवहन खात्याकडून त्यांना विशेष स्टिकर पुरवण्यात येणार आहेत.

स्टिकर गाडीच्या दर्शनी भागावर लावल्यामुळे ही वाहन अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करतात हे पोलिस आणि संबंधित यंत्रणांच्या लक्षात येईल आणि या वाहतूकदारांना विनाअडथळा राज्यांमध्ये मालवाहतूक करता येईल. याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी अधिकारी आणि मालवाहतूक ट्रक आणि टेम्पो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीमध्ये निर्णय घेतला.

Loading...

वाहतूकदारांनी अशा चालकांना आणि कामगारांना ओळखपत्र पुरवाव्यात किंवा संघटनेच्या लेटरहेडवर अशा व्यक्तींची नावे नमूद करून सदर यादी वाहनात ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, यासंदर्भात कुठलीही अडचण आल्यास परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई येथे आजपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येईल आणि 24 तास चालणाऱ्या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 22614724 असेल. याच्यावर संबंधित वाहतूकदारांना संपर्क साधता येईल.

ट्रेंडिंग बातम्या-

लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे; जयंत पाटलांची मोदींवर सडकून टीका

घाबरू नका, माझं मोदींशी बोलणं झालंय; जीवनावश्यक गोष्टी सुरू राहतील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महत्वाच्या बाम्या-

हा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करा आणि सर्व शंका विचारा; उद्धव ठाकरेंचं आवाहन

जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या गोष्टी

“लोकांनो घाबरू नका, गडबड गोंधळ करू नका; भाजीपाला, किराणा दुकाने तसंच मेडिकल सुरू राहणार”

 

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या