बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुझ्या बॅटमध्ये स्प्रिंग आहेत का?’; षटकार मारल्यावर स्टोक्सनं शार्दुलची बॅट तपासली

पुणे | भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 330 धावांचं मोठं आव्हान पाहुण्यासंघाला दिलं होतं. या सामन्यात भारताच्या सर्व खेळाडूंनी फलंदाजी केली होती. हा सामना भारताच्या खराब क्षेत्ररक्षणामुळं चर्चेत राहिला होता. तर त्याआधी ही अनेक मजेशीर गंमती या सामन्यात घडल्या होत्या. भारताची फलंदाजी चालू असताना असाच एक मजेशीर किस्सा शार्दुल ठाकूर आणि बेन स्टोक्स यांच्यासोबत घडला.

भारताच्या 6 विकेट पडल्यानंतर शार्दुल ठाकूर फलंदाजी करायला आला. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स 45वं षटक घेऊन गोलंदाजी करायला आला होता. या षटकात स्टोक्सने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर शार्दूलने लाँग ऑफच्या दिशेने जोरात षटकार मारला. त्याच्या या षटकाराने स्टोक्स देखील आश्चर्यचकीत झाला. त्याने शार्दूल जवळ जाऊन शार्दुलची बॅट हातात घेतली.

बॅट हातात घेतल्यावर तुझ्या बॅटमध्ये स्प्रिंग आहेत का?, असा प्रश्न स्टोक्सने विचारला. त्यानंतर ते दोघेही एकमेकांकडून हसताना दिसले. या सामन्यात अनेक घटना पहायला मिळाल्या. या सामन्यात एक दोन नव्हे तर भारतीय खेळाडूंनी 5 झेल सोडले. हार्दिक पांड्याने सोडलेल्या झेलमुळे भारताला या सामन्यात शेवटपर्यंत झुंज द्यावी लागली होती.

दरम्यान, शेवटच्या षटकापर्यंत चाललेला हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला. इंग्लंडच्या सॅम करणने शेवटपर्यंत चिवट झुंज दिली. पण त्याला संघासाठी विजय खेचता आला नाही. तर भारताकडून शार्दुल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमारने चांगल्या गोलंदाजीचा मारा केला होता.

थोडक्यात बातम्या-

‘ही’ प्रसिद्ध गायिका लवकरच करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

“रिषभ पंत असाच खेळत राहिला तर एक दिवस धोनीलाही मागे टाकेल”

महाराष्ट्रात कोणासोबत सरकार बनवणार… अमित शहांच्या नव्या वक्तव्याने मोठी खळबळ

अल्पवयीन बालिकेचा विवाह रोखण्यात यश ; मंत्री यशोमती ठाकूर यांची धडक कारवाई

शेतकऱ्यांचा संताप अनावर; भररस्यात भाजप आमदाराचे कपडे फाडून केली मारहाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More