बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कार्तिक आर्यन समोर येताच तिने केलं असं काही की…; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई | आपल्या चाहत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला भेटण्याची सर्वांची इच्छा असते. बाॅलिबूड आणि त्यांच्या फॅन्सच्या अनोख्या कहाण्या सोशल मीडियावर आपल्याला पहायला मिळतात. बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या एका लेडी फॅनचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन नेहमी चर्चेत असतो. त्याच्या क्युट स्माईल आणि रोमाँटीक कलाकारीमुळे कार्तिकने सिनेसृष्टीत नाव कमावलं. कार्तिक आर्यनचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. अशाच एका चाहतीनं कार्तिकला भेटण्यासाठी तसेच आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कार्तिकच्या घरासमोर तासंतास उभी राहिल्याचं दिसून आलं. तीनं कार्तिकला भेटण्याची इच्छा प्रकट केली होती.

खूप वेळ ती घराबाहेर थांबल्याने कार्तिकला त्या चाहतीला भेटण्यासाठी बाहेर यावं लागलं. खुद्द कार्तिक तिला भेटायला आल्यानं तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कार्तिक समोर आल्यानंतर ती एका गुडघ्यावर खाली बसली आणि कार्तिकला प्रपोज केलं. हे पाहून कार्तिक देखील अवाक झाला अन् त्यानं तिला समजवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर तिला मिठीही मारली.

चाहतीच्या मोबाईलवरून त्याने स्वतः तिच्यासोबत सेल्फी काढला. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला साडेआठ लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. यावर व्हिडीओवर हजारो प्रतिक्रिया आल्या आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

थोडक्यात बातम्या-

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा; जाणून घ्या काय आहे प्रकरण

चोरट्या चीनचा रडीचा डाव; कोरोना लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्या चीनच्या निशाण्यावर

“भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवा”

‘ …तर आम्ही मदत करू शकतो’; न्यायालयानं बलात्काऱ्याला विचारलेल्या प्रश्नानं सगळेच हैराण!

मी कोरोनाला कधीच घाबरलो नाही, कारण…- भगतसिंह कोश्यारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More