बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनी हाईस्टच्या ‘बेला चाओ’ गाण्याच्या देशी व्हर्जनचा सोशल मीडियावर तुफान राडा, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या ‘मनी हाईस्ट’ या वेबसिरीजने अनेक लोकांना वेड लावलं आहे. मनी हाईस्ट ही जरी एक परदेशी वेबसिरीज असली तरी देखील आपल्या देशात या वेबसिरीजचा मोठा चाहता वर्ग आहे. वेबसिरीज बरोबरच त्यातील ‘बेला चाओ’ हे गाणं प्रत्येकाच्याच तोंडावर आहे .

अशातच आता बेला चाओ या गाण्याचं एक देशी व्हर्जन काही मुलांनी तयार केलं आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ गुजरातमधील एका सार्वजनिक कार्यक्रमाचा आहे.

या कार्यक्रमात लोकांनी बेला चाओ गाण्याचा खूप आग्रह केला होता. लोकांच्या आग्रहानंतर गायकाने देखील हे गाणं गायलं. तबला, पेटी, ढोलकी आणि इतर भारतीय वाद्यांच्या तालावर गायकाने बेला चाओ गाण्याचा सूर पकडला. बेला चाओचं हे देशी व्हर्जन लोकांना चांगलंच आवडलं.

गाणं सुरु होताच लोकांनी मोठ्या उत्साहाने नाचण्यास सुरुवात केली. या गाण्याला लोकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी दाद दिली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

A post shared by Patil Nik’s (@niks_music143)

थोडक्यात बातम्या –

चिंताजनक! कोरोनामुळे कुपोषणाचा धोका वाढलाय, डाॅक्टरांचा गंभीर इशारा

“ममता बॅनर्जी मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय, अनेक राज्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास तयार”

“बारामती हा महाराष्ट्राचाच भाग आपण तो देखील जिंकू”

पुरंदरची खुमखुमी पुणे महापालिकेत काढू- विजय शिवतारे

“जेवणाच्या ताटावरुन उठवलं, आणखी कशावरुन उठवायचं सांगा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More