बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वादळ 4 तास थांबलं, मुख्यमंत्री 3 तासही थांबले नाही”

मुंबई | भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांच्या पुढाकाराने पत्रे, ब्लँकेट, बल्ब आणि विविध उपयोगी साहित्याचा ट्रक पालघरला पाठवण्यात आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते या ट्रकला हिरवा कंदिल दाखवण्यात आला. यावेळी कोकणात वादळ चार तास थांबलं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन तासही थांबले नाहीत, अशी टीका प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा तीन दिवस 700 किलोमीटरचा दौरा केला. अनेक गावांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त लोकांची भेट घेतली. मच्छिमारांशी, बगायतदारांशी संवाद साधला. त्यांच दु:ख समजून घेत मदतीचा विश्वासही आम्ही त्यांना दिला. परंतु राज्याचे मुख्यमंत्री तीन तास सुद्धा कोकणात फिरू शकले नाहीत, अशी टीका दरेकरांनी केली.

मुख्यमंत्री स्वत: खासगी विमान घेऊन रत्नागिरीला आले होते. त्यांनी विमानतळावरचं बैठक घेतली. नुकसानग्रस्त लोकांची भेट घेणं तर लांबच परंतु त्यांनी कलेक्टर ऑफिसला जाऊन माहिती सुद्धा घेतली नाही. सर्व अधिकाऱ्याना विमानतळावर बोलावून बैठक घेतली. बैठक झाल्यावर चिपी विमानतळावर गेले. अधिकाऱ्यांना बोलवले आणि हेलिकॉप्टरने परत मुंबईला आले. स्वतः विमानाने दौरा करायचा आणि पंतप्रधानांच्या हवाई दौऱ्यावर टीका करायची ही कोणती पद्धत आहे?, असा सवाल प्रविण दरेकरांनी केलाय.

सगळ्या मंत्र्यांनी तात्काळ पंचनामे होतील, असं सांगितलं. मात्र आठवडा उलटून गेला तरी देखील पंचनामे झाले नाहीत. मुख्यमंत्री पंचनामे झाल्यावर मदत जाहीर करू असे सांगतात. पंचनाम्याच्या नावाने कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या महाविकास आघाडी सरकारने केलं आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात अतिदिव्यांग व्यक्तींना घरबसल्या मिळणार कोरोना लस; प्रशासनाचा स्तुत्य निर्णय

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

टॅक्सी चालकाने भाडं नाकारलं अन् त्याच्यासोबत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक; रिकव्हरी रेट 92.12 टक्यांवर

“महाराष्ट्राच्या हितासाठी कटूपणा घ्यायची माझी तयारी आहे”; मुख्यमंत्र्यांचं लॉकडाऊनबाबत मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More