बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये तुफान हाणामारी; भाजप खासदाराला कपडे फाटेपर्यंत मारलं, पाहा व्हिडीओ

लखनऊ | उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये झालेल्या एका सार्वजिक कार्यक्रमात भाजपचे कार्यकर्ते आणि काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली पाहायला मिळाली. या हाणामारीमध्ये भाजप खासदार संगमलाल गुप्ता यांच्यासह अनेक कार्यकर्तेही जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशात एका आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी आणि आमदार आराधना मिश्रा देखील उपस्थित होते. याशिवाय या कार्यक्रमामध्ये खासदार संगमलाल गुप्ता उपस्थित होते. यावेळी या दोन पक्षांमध्ये काही कारणास्तव तुफान हाणामारी झाली.

हाणामारीमध्ये काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संगमलाल गुप्ता यांना भररस्त्यात पाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. काॅंग्रसचे कार्यकर्ते जास्त असल्यानं त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना पळूनपळून मारलं, असा आरोप त्यांच्यावर केला आहे.

दरम्यान, या सर्व घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही पोलिसही जखमी झाले. हल्लेखोरांना सरकार सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्या यांनी ट्विट करत म्हटलं.

 

थोडक्यात बातम्या – 

कोणताही क्लास न लावता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशवंतने UPSC केली क्रॅक!

“मोदींना टक्कर देऊ शकेल असा कोणता नेता असेल तर त्या ममता बॅनर्जी आहेत”

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

रोमांचक सामन्यात पंजाबचा दणदणीत विजय! सनरायजर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More