Top News

“….म्हणून शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी माफी मागितली पाहिजे”

नवी दिल्ली | फक्त भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस पक्षानंं सत्तेत येण्याचा निर्णय घेतला असल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं. यावर चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागतली पाहिजे, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे.

हिंदूंना शिव्या देणं आणि मुस्लिमांचं संतुष्टीकरण करण्याचं काम काँग्रेसकडून केलं जात आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने आपलं नाव इंडियन नॅशनल काँग्रेसऐवजी मुस्लिम लीग काँग्रेस करावं, अशी टीका संबित पात्रा यांनी केली आहे.

एका धर्माच्या संतुष्टीकरणासाठी दुसऱ्याला शिव्या घालण्याचं काम आम्ही केलं नाही. फक्त सत्तेसाठी काँग्रेसनं मुस्लिमांवर प्रेम केलं असल्याची टीका पात्रा यांनी केली आहे.

दरम्यान, हिंदूंना शिव्या आणि मुस्लिमांबद्दल प्रेम, काँग्रेस हेच करत आलं असल्याचं, पात्रा यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“…म्हणून मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढेंची नागपुरात बदली केली असावी”

“आमच्याकडे सर्टीफिकेट मागण्यापूर्वी मोदींनी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट आणावं”

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या