‘ही’ थ्री-व्हीलर इलेक्ट्रीक कार 2 रूपयात 5 किमी धावणार!; जाणून घ्या किंमत…
नवी दिल्ली | एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शंभरी गाठत असताना लोक आता गाड्यांसाठी पर्यायी मार्ग शोधत आहेत. अशात खिश्याला परवडणाऱ्या गाडीचा पर्याय लवकरच बाजारात येत आहे. ऑटो सेक्टरच्या कंपन्या आता इलेक्ट्रीक गाड्यांच्या उत्पादनाचा पर्याय निवडत आहेत. अशीच एक भन्नाट इलेक्ट्रीक गाडी लवकरच भारतात उपलब्ध होणार आहे.
स्ट्राॅम मोटर्स ही कंपनी आता थ्री-व्हीलर कार भारतीय बाजारात आणणार आहे. या गाडीचं नाव ‘स्ट्राॅम आर 3’ असं ठेवण्यात आलं आहे. या गाडीचं वैशिष्टय म्हणजे ही गाडी फक्त 2 रूपयात 5 किलोमीटर अंतर पार करू शकते. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही गाडी 200 किलोमीटर पर्यंत धावू शकेल. या गाडीत 2 सीटर कॅबीन असून इतर अनेक सुविधा गाडीत देण्यात आल्या आहेत.
या गाडीला पुढे 2 चाकं असून मागं गाडीला एक चाक आहे. या गाडीत ब्लाॅक आऊट बी पिलर्स, ऑटो क्लायमेेट कंट्रोल, पाॅवर विंडो आहेत तर गाडीच्या मागील बाजूस टेललाईटस देण्यात आली आहेत. तर 4.3 इंच टचस्क्रिन डिजीटल क्लस्टर देण्यात आलं आहे.
दरम्यान, ही गाडी 80 किमी प्रति तास धावू शकते. तर या कारला 3 वर्षाची वाॅरंटी देण्यात येणार आहे. ही गाडी भारतातच उत्पादित केली जाते. तर या गाडीची किंमत 4.5 लाख रूपये ठेवण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या –
चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत नराधमाने केलं धक्कादायक कृत्य!
…तर शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढेन- नितेश राणे
“देश नहीं बिकने दूंगा म्हणत मोदी सरकार एक एक करत सर्व विकतंय”
चिंताजनक! पुण्यात कोरोना रूग्णांना खाजगी रूग्णालयात बेड मिळेना
कोरोना लसीकरणासंदर्भात आनंद महिंद्रांनी मोदींकडे केली ‘ही’ मोठी मागणी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.