बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटीचं कौतुकास्पद पाऊल, आता महिला बस चालवताना दिसणार!

औरंगाबाद | अनेक ठिकाणी आपण महिला रिक्षाचालक बघतो. अशातच आता आपण महिलांना बस चालवताना देखील पाहणार आहोत. एसटी महामंडाळाने घेतलेल्या कौतुकास्पद निर्णायामुळे अनेक महिलांना एक सुवर्णसंधी लाभली आहे. एकूण 32 महिला एसटी चावलणार आहेत तसेच या सर्व महिलांना प्रशिक्षण देखील देण्यात आलं आहे.

ड्रायव्हिंगमध्ये रुची असणाऱ्या या महिलांना इथपर्यंत पोचण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. मात्र तरी आपल्या आवडीने, जिद्दीनं या महिलांनी अडथळ्यांवर मात केली आहे. विशेष बाब म्हणजे यातील अनेक महिलांनी धाडस नसताना देखील या क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. एवढंच नाही तर अनेक महिलांनी कधी गाडी चालवली नसून अनेकांनी शहरातील रस्ते देखील ओलांडलेले नाहीत, मात्र आता प्रशिक्षणामुळे त्यांच्यात आत्मविश्वास आला आहे.

औरंगाबाद आणि नाशिक विभागातील 32 महिला एसटी चालक बनणार आहेत. दोन स्टिअरिंग असलेल्या बस मधून या महिलांना बस वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण 100 दिवसांचे वर्ग प्रशिक्षण तर 200 दिवस बस चालवण्याचे प्रशिक्षण अशा पद्धतीमध्ये दिले जात आहे.

दरम्यान, आता राज्यातील महिला एसटीवर चालक म्हणून काम करणार आहेत. एसटी महामंडाळाच्या या निर्णायामुळे अनेक महिलांना काहीतरी करुन दाखवण्याची संधी प्राप्त झाली आहे. तर अनेक महिलांनी ड्रायव्हिंग हेच आपले करिअर असल्याचं निश्चित केलं आहे. आगामी काळात आणखी महिलांना एसटी महामंडळात अशाप्रकारे ड्रायव्हरची संधी उपलब्ध होऊ शकते.

थोडक्यात बातम्या-

इथं फक्त सेक्स विकला जातो!; ‘या’ ॲप्सवरही अश्लील व्हिडीओंचा सुळसुळाट

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडण्यास परवानगी मिळणार?

“तुम्हाला लाज वाटली पाहिजे खोटे आरोप करताना”, राज कुंद्रा प्रकरणात राखीची उडी

आजही मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

अश्लील व्हिडीओ व्हायरल, मुलीनं पोलीस ठाण्यात धाव घेत सांगितली आपबीती!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More