तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आदिवासी विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे | आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्याने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना भोसरीत घडली आहे. अमित गणपत वाळवा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. 

अमितला सध्या भोसरीमधील साईनाथ हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.

अमितने रात्री 10 च्या सुमारास हे पाऊल उचललं. त्यावेळी निवासी गृहपाल आणि सुरक्षारक्षक काय करत होते?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

दरम्यान, अमितने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र शासनाच्या डीबीटी योजनेचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. 

महत्वाच्या बातम्या-

-बुलंदशहर हिंसाचाराचं दादरी कनेक्शन; मृत पोलीस अधिकारी होते साक्षीदार

-शिवसेना दुष्काळाच्या मुद्यावरुन सरकारला घेरणार? मंत्र्यांना दुष्काळ दौऱ्यांचे आदेश

-सर जिओ नहीं चल रहा है; ग्राहकाची थेट मुकेश अंबानींकडेच तक्रार!

-महेश कोठारेंच्या घरावर ‘स्पेशल 5’ चा छापा

-DYSP भाग्यश्री नवटकेंना जेलमध्ये टाका, अन्यथा हायकोर्टात जाणार!