सातारा | सातारा जिल्ह्यातील विद्यमान उपसरपंचाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. ते साताऱ्यातील होळ गावचे उपसरपंच होते.
विनोद भोसले असं या उपसरपंचाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी व्याजाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, आत्महत्येच्या कारणासोबत चिठ्ठीत व्याजासाठी त्रास देणाऱ्यांची नावेही विनोद यांनी लिहिली आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-केरळसाठी फुटबॉलपटू सुनील छेत्रीचं भावनिक आवाहन
-केरळमधील महापुराची मोदींकडून पाहणी; मोठा निर्णय जाहिर
-केरळला पुण्यातून पिण्याच्या पाण्याची सोय; रेल्वेने पाठवणार 7 लाख लिटर पाणी
-तात्काळ मदत मिळाली नाही तर 50 हजार लोकांचा बळी जाईल!
-अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकावर कारवाई