रजनीकांत अशिक्षित; सुब्रमण्यम स्वामींनी उडवली खिल्ली

नवी दिल्ली | दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केलीय. मात्र भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांची खिल्ली उडवलीय. 

रजनीकांत अशिक्षित आहे. माध्यमांचं लक्ष खेचून घेण्यासाठी ते अशाप्रकारे घोषणा करत आहेत, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलंय. त्यांना पक्षाचं नाव आणि उमेदवारांची नावं जाहीर करु दे, मग मी त्यांना उघडं पाडतो, असंही सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. 

दरम्यान, रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात उडी घेतल्यानं दक्षिणेच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.