दिवाळीपूर्वी राम मंदिर बांधायला सुरुवात होईल- सुब्रमण्यम स्वामी

जयपूर | येत्या दिवाळीपूर्वी राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात होईल, असं भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलंय. ते जयपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. 

राम मंदीर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याची सुनावणी मार्चपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर एक-दोन महिन्यात निकाल येईल. निकाल आमच्याच बाजूने लागेल त्यामुळे दिवाळीपूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल, असं स्वामी यांनी म्हटलं.

हा वाद खटला सहमतीने सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ते सफल झाले तर लवकर निर्णय येऊ शकतो, असंही ते म्हणाले.