बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑक्सीजनच्या कमतरतेवरून सुब्रमण्यम स्वामींनी मोदी सरकारला झापलं, म्हणाले…

नवी दिल्ली | देशात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. देशात दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून राज्यांना आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड्सचा तुटवडा जाणवत आहे.

देशातील ऑक्सीजनच्या कमतरतेवरून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारल सुनावलं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात एक ट्विट करत सरकारला सवाल केला आहे. आपल्या जवळ किती ऑक्सिजन उपलब्ध आहे, हे सांगणं सरकारने बंद करावॆ. त्याऐवजी, आपण किती सप्लाय केला आहे आणि तो कोण-कोणत्या रुग्णालयांना केला आहे, हे सरकारने सांगायला हवं, असं म्हणत स्वामींना मोदी सरकारवर निशाणा साधलाय.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच स्टँडिंग कमिटी फॉर हेल्थने ऑक्सिजन सिलेंडर आणि सप्लायची कमी असल्याचे म्हटलं होतं. मात्र सरकारने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलंय.

देशात गेल्या चोवीस तासांत 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे 3417 जणांचा मृत्यू झाला. तसेच 3 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. जगातील इतर देशांपेक्षा भारतात दिवसेंदिवस सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

भारतात कोरोना स्थितीचा वाईट काळ येणं अजून बाकी आहे- सुंदर पिचाई

“बीसीसीआयने 700-800 कोटींची मदत करावी, देशाला उपकाराची परतफेड करण्याची वेळ”

अवघ्या 32 वर्षीय IRS अधिकारी अनंत तांबेंचं कोरोनानं निधन!

दिलासादायक! पुण्यात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त

ममता बॅनर्जी यांची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड; 5 मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More