बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अर्थमंत्रालयात कमी IQ वाले लोक, मोदींना तर अर्थव्यवस्थाच समजत नाही”

नवी दिल्ली | भारताच्या अर्थमंत्रालयामध्ये कमी बुद्धी, कमी IQ वाले लोक आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना तर अर्थव्य़वस्थेबाबत काही कळत नाही, अशी टीका भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

अमेरिकेचा चॅनल Valuetainmentच्या पॅट्रिक बेट डेव्हीड यांनी स्वामी यांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.

डेव्हीड यांनी स्वामींना त्यांच्या मोदींबाबतच्या भोळे आणि अनुभव नसलेले अर्थशास्त्री या वक्तव्याची आठवण करून दिली. तसेच मोदींना मंत्रिमंडळात अर्थमंत्री करण्याची मागणीही एकदा स्वामींनी केल्याचं ते म्हणाले. यावर सुब्रमण्यम स्वामी हसले. मोदी माझे मित्र आहेत आणि त्यांना मी 70 च्या दशकापासून ओळखतो. मला असं म्हणायचं होतं की मोदींना अर्थव्यवस्थेबाबत काहीच माहिती नाहीय. हाच शब्द त्यांच्यासाठी जास्त योग्य आहे, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

देशाच्या अर्थमंत्रालयात कमी आयक्यू असलेले लोक आहेत. मी पंतप्रधानांचा जुना मित्र असल्याने मोदींना ओळखतो. त्यांनाही कमी आयक्यूवाले लोक आवडतात. ते आज्ञाधारक लोकांना पसंत करतात. हीच त्यांची कमजोरी आहे. स्वतंत्र रुपाने काम करणारे लोक त्यांना आवडत नाहीत. मला त्यामुळेच दूर ठेवण्यात आले आहे, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“चंद्रकांत पाटलांनी छत्रपतींना उपकाराची आठवण करुन दिली”

“एक रुपया इंधन दरवाढ झाली की आंदोलने करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते आता कुठे लपलेत?”

“चंद्रकांत पाटलांना मस्ती आलीये, आपलं हसं होऊ नये म्हणून…”

“मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच पडली पाहिजे”

‘परमबीर सिंग यांच्या इशाऱ्याने वाझेकडून खंडणी वसुली’; कार डिझायनरच्या पत्राने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More