नवी दिल्ली | भाजप खासदार सुधीर गुप्ता यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. परदेशी कन्येपासून झालेला राहुल गांधींचा जन्म देशासाठी मोठी चूक आहे, असं वादग्रस्त वक्तव्य सुधीर गुप्ता यांनी केलं आहे.
पुलवामा हल्ल्यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटला प्रत्युत्तर देत सुधीर गुप्ता यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. सुधीर गुप्ता यांच्या या वक्तव्यावर अद्याप काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
एका इटालियन महिलेसोबत एका भारतीय व्यक्तीचा विवाह केल्यामुळे कोणाला फायदा झाला. विवाहाचा निष्कर्ष राहुल गांधी आहेत. या विवाहाच्या चुकीसाठी कोण जबाबदार आहेत?,असा सवाल करत सुधीर गुप्ता यांनी राहल गांदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, आज आपण पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहत आहोत. पण या सोबतच या हल्ल्यामुळे सर्वात जास्त फायदा कुणाचा झाला? या हल्ल्यासंदर्भातील चौकशीतून काय समोर आलं?, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
बॅंक ऑफ बडोदाच्या ATMवर पहिल्या नंबरवर गुजराती, मराठीला स्थानच नाही!
मला राजकारणात यायचं नव्हतं पण…- पूनम महाजन
महत्वाच्या बातम्या-
पवार साहेबांना ओळखायला दहा जन्म घ्यावे लागतील- धनंजय मुंडे
केजरीवालांची फुकट योजना महाराष्ट्रात नको- अजित पवार
अरविंद केजरीवाल आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार!
Comments are closed.