‘अजब सरकारची गजब कहाणी’; मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर बोचरी टीका
मुंबई | सध्या महाराष्ट्रात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सर्वत्र चर्चेत आहे. याप्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजप सातत्याने करत आहे. अशात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशन घेण्यात यावं यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला.
कोरोना काळात निर्बंध लावलेले असताना सरकारमधील एक मंत्री 10 हजार लोकांना सोबत घेवून शक्तिप्रदर्शन करतो. पण सरकार महाराष्ट्रात कोरोना हात-पाय पसरत असल्याच्या कारणावरून अधिवेशन रद्द करतं. त्यामुळे या सरकारचं कामकाज म्हणजे अजब सरकार की गजब कहाणी, असं म्हणत मुनगंटीवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
वनमंत्री आहे म्हणून तो वनामध्ये कधीही कोणावरही हल्ला करु शकतो, असे वन कायदे वनमंत्र्यांना लागू नाहीत, असं म्हणत मुनगंटीवारांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर टीका केलीये.
दरम्यान, कोरोनाबाबत सर्व खबरदारी घेऊन अधिवेशन घेण्यात यावं. मात्र कोरोनो वाढत आहे. या कारणावरून अधिवेशन रद्द करु नये, असं मुनगंटीवार म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
‘…तर तुम्ही कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात या’, हसन मुश्रीफांचं भाजप नेत्यांना आव्हान
लाईव्ह रिपोर्टिंग करताना चोरट्याने रोखली पत्रकारावर बंदूक, अन्…; पाहा व्हिडिओ
‘नक्षलवादी होण्याची परवानगी द्या’; मराठवाड्याच्या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!
‘कॅशियरसोबत फ्लर्टिंग करायचं नाही’; ‘या’ मेड इन पुणे पाटीनं गाजवलं सोशल मीडिया
‘महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे…’; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य
Comments are closed.