रतन खत्री कोण आहे हे फक्त राज ठाकरेंना माहीत!

मुंबई | रतन खत्री कोण आहे हे फक्त राज ठाकरेंना माहीत आहे, आम्हाला माहीत नाही, असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. असं वक्तव्य करुन त्यांनी एकप्रकारे राज ठाकरेंवर पलटवार केलाय. 

राज ठाकरे यांनी साताऱ्यातील पदाधिकारी मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. केंद्रातील आणि राज्यातील  सरकार हे फक्त थापाड्यांच सरकार असुन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे रोज नवे-नवे आकडे देतायत. मुख्यमंत्री रतन खत्रीकडे कामाला होते का? असा सवाल त्यांनी विचारला होता. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यावर अद्याप कोणतं भाष्य केलं नाही, मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय.