बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर सरकार बरखास्त होऊ शकतं- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर | कोरेगाव भीमा हिंसाचार तपासाबाबत महाराष्ट्र सरकार राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA च्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसेल तर राज्य सरकारला गंभीर कारवाईला सामोरं जावं लागेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास एनआयकडे सोपवण्यात आला आहे. मात्र याला राज्य सरकारचा विरोध आहे. शरद पवारांनी विशेष समितीची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली होती. त्यानंतर केंद्राने हा तपास एनआयकडे सोपवला. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे.

राज्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ला सहकार्य न केल्याने इंदिरा गांधी यांच्या काळात अनेक राज्यांवर कारवाई झाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. NIA चे अधिकारी रिकाम्या हाती गेले असतील तर राज्य सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.

दरम्यान, मी कायद्यातील तरतुदी सांगितल्या, मी शंका व्यक्त केली नाही. केंद्राच्या कायद्यातील तरतुदीबाहेर जाऊन एखादं राज्य हे कृत्य करत असेल तर आपल्याला माहित आहे की इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना अनेक राज्ये बरखास्त केली होती, असं मुनगंटीवार म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या- 

दात कोरून पोट भरण्याचे उद्योग; शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका

हातात बूट घेऊन देवेंद्र फडणवीस स्टेजवर, रूपाली चाकणकर म्हणतात…

महत्वाच्या बातम्या- 

…म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा रद्द

पडद्यावरच्या खलनायकानं जिंकली जनतेची मनं

“अशोक चव्हाण यांच्या बोलण्याची पद्धत चुकीची”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More