बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळा’; नव्या मंत्र्यांना नरेंद्र मोदींनी केल्या ‘या’ सूचना

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नवनिर्वाचीत केंद्रीय कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची बैठक घेतली. मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मोदींनी नव्या मंत्र्यांना 5 महत्वाच्या सूचना केल्या आहेत. 15 ऑगस्टपर्यंत नवनिर्वाचित मंत्र्यांनी दिल्ली सोडू नका, महिन्याभरात म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत मंत्रालयात हजर रहा, मिळालेल्या मंत्रालयाचं कामकाज समजून घ्या,अनावश्यक वक्तव्य नकोत, जल्लोष मर्यादीत राहील याची काळजी घ्या, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

राज्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्र्यांसोबत मिळून काम करावं. असं काम ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकेल. तुम्हाला देशासाठी काम करायचं आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलंय.

मंत्रिमंडळ विस्तार करण्यापूर्वी एकूण 12 मंत्र्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता त्यामागचं खरं कारण समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मागचं कारण सांगितलं आहे. 12 मंत्र्यांच्या राजीनाम्याचा आणि त्यांच्या कार्यक्षमतेचा काहीही संबंध नाहीये. व्यवस्थेमुळे हा बदल करण्यात आला आहे, असं नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय.

नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेचा काहीही संबंध नाही. आता या अनुभवी असलेल्या मंत्र्यांकडून शिकण्यासारखं तुमच्याकडे आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

‘…तर मी पुन्हा येईन’; भर कार्यक्रमात संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

रस्त्यावर ‘वर्दी उतरव’ म्हणत तरूणाची पोलिसांसमोर मुजोरी; अटकेनंतर ढसाढसा रडला

एकनाथ खडसेंची तब्बल 9 तास ईडी चौकशी; चौकशीला खडसेंचा सकारात्मक प्रतिसाद

…म्हणून त्या 12 मंत्र्यांचा राजीनामा घेतला- नरेंद्र मोदी

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीला ‘आनंद पोटात मायेना’; शेअर केली खास पोस्ट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More