मंत्रालयातील सचिवाची पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या

सोलापूर | मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावचे सुपुत्र व मंत्रालयात कौशल्य विकास विभागात सहसचिव म्हणून कार्यरत असणारे, विजयकुमार भागवत पवार यांनी पत्नी सोनाली पवार यांच्यावर गोळीबार करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

रात्री 12:30 च्या सुमारास मरवडे गावात ही घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पवार यांनी पत्नीवर गोळीबार केला आहे.  

सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्या पत्नीवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांना दोन गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. 

दरम्यान, विजय पवार हे सरदार सरोवर गाऱ्हाणे निराकरण प्राधिकरणाचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून नंदुरबार येथे होते. 

महत्वाच्या बातम्या-

-“पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार”

-उदयनराजेंच्या विरोधात शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी

-पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दणका, ‘या’ ज्येष्ठ नेत्याच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश

-नगरमधून दुसरं तिसरं कुणी नाही! भाजपकडून सुजय विखेंचं नाव जाहीर

भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातली ‘ही’ 16 नावे…