बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुजय विखे अन् पार्थ पवार यांचा एकत्र विमान प्रवास, फोटो शेअर करत सुजय विखे म्हणाले…

नवी दिल्ली | भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार याचे एकत्र विमान प्रवासाचे फोटोज समोर आले आहेत. अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला. दोघांनीही जवळपास 40 मिनिटे एकत्र प्रवास केला. या प्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली.

औरंगाबाद ते मुंबई या प्रवासानंतर खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर दोघांचे विमानातला आणि एअरपोर्टवरचे फोटोज पोस्ट केले आहेत. हे फोटोज शेअर करत असताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, सर्व सीमांच्या पलिकडची मैत्री.

आपल्या फेसबूक आणि ट्विटर अकाऊंटवर सुजय विखे पाटील यांनी हे फोटोज शेअर केले आहेत. सुजय विखे पाटील यांनी पार्थ पवारांसोबतचे फोटो सोशल मीडियात शेअर केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

दरम्यान, वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची मैत्री हा एक वेगळा भाग असतो. राजकीय नेत्यांच्या मैत्रीची महाराष्ट्रात अनेक उदाहरणे आहेत. त्याचाच एक भाग सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांच्याबाबतही आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘या’ अटीवरच ईडीने महाराष्ट्रात यावं, नाहीतर येऊ नका – उदयनराजे भोसले

“फडणवीसांच्या काळात कुणी काय केलं ते लवकरच बाहेर काढणार”

…म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटलांना दिली ‘नवरत्न तेलाची बाटली’ गिफ्ट!

“दलित आणि मुस्लिमांची नावे मतदार याद्यांतून गहाळ करण्यात आली आहेत”

“तुम्हालाही माझा अभिमान वाटेन”; आर्यन खानने समीर वानखेडेंना दिलं ‘हे’ वचन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More