अहमदनगर महाराष्ट्र

‘…नाही तर मी राजीनामा देईल’; सुजय विखे पाटील भडकले

अहमदनगर | राहुरीतील डॉ. बाबुराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखान्यापुढील अडचणी संपायला तयार नाहीत. कर्जपुरठा आणि अन्य प्रश्न सोडवून गाळप हंगाम सुरू केला खरा पण त्यातही अडचणी येऊ लागल्या आहेत.

कारखाना वारंवार बंद का पडतो, याची पाहणी करण्यासाठी भाजप खासदार सुजय विखे गेले असता बॉयलरमध्ये चक्क साखरेची पोती आढळून आली. हा खोडसाळपणा पाहून विखे संतापले. 72 तासांत कारभार सुधारला नाही तर आपण संचालक मंडळासह राजीनामा देऊ, अशी घोषणाच खासदार सुजय विखे यांनी केली आहे.

पुढील वर्षी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्यावेळी याचा फटका बसू शकतो. शिवाय विखे यांनी लोकसभा निवडणुकीपुरतेच लक्ष घातलं होतं, असा आरोपही होऊ लागला होता. त्यामुळेच याची पाहणी करण्यासाठी डॉ. विखे यांनी शनिवारी कारखान्याला भेट दिली.

यावेळी बॉयलरमध्ये त्यांना साखरेची पोती आढळून आली. हा प्रकार आपोआप किंवा तांत्रिक बिघाडामुळे मुळीच होऊ शकत नाही. हा कोणी तरी केलेला खोडसाळपणा आहे. याची चौकशी करा, संबंधितांवर कारवाई करा, कारखाना सुरळीत सुरू करा, अन्यथा आपण कारखान्याच्या पदाधिकारी, संचालक मंडळासह राजीनामा देऊ, अशा इशाराच विखे यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाही तर…’; मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही- जयंत पाटील

“सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर…”

तो स्कूटर घेऊन गल्लीबोळात हिंडत होता; स्कूटरमध्ये निघाली ‘ही’ धक्कादायक गोष्ट!

“14 वर्षांचा शिवाजी वाचा 54 वर्षांच्या पप्पूकडे बघण्याची गरज नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या