बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील पहिल्या महिला कंडक्टर सुनंदा कुंभार यांचं कोरोनाने निधन

सोलापूर | राज्यात कोरोनाने हैदोस घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारीही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये अभिनेते, उद्योजक, डॉक्टर आणि नेते यांना आपला प्राण गमवावा लागाला आहे. अशातच राज्यातील पहिल्या बॅचच्या महिला एसटी कंडक्टर सुनंदा अशोक कुंभार यांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे.

21 एप्रिलला सुनंदा यांनी आपली कोरोनाची चाचणी करून घेतली होती. त्यावेळी त्यांच्या चाचणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्या सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या. मात्र उपचारादरम्यान सुनंदा यांची वयाच्या 45 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. सुनंदा कुंभार यांच्या पश्चात पती, तीन मुले आणि नणंद आहेत. त्यांच्या मृत्युमुळे इतर कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.

लांब पल्ल्यांच्या मार्गावर जाण्याचे धाडस करणाऱ्या आणि प्रवाशांना नेहमी सौजन्याने सेवा देणाऱ्या सुनंदा अशोक कुंभार या नोव्हेंबर 2000 पासून एसटीच्या सेवेत रुजू झाल्या होत्या. सुनंदा मनमिळावू स्वभावाच्या होत्या आणि प्रवाशांना सेवा देण्यासाठीच्या तत्परतेमुळे त्यांनी सोलापूर विभागात स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं.

दरम्यान, ‘एसटी’त रुजू झाल्यापासून त्यांनी उस्मानाबाद, तुळजापूर, बार्शी आणि सोलापूर या ठिकाणी वाहक म्हणून सेवा बजावली होती. सुनंदा यांनी केेलेल्या सेवेमुळे अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.

थोडक्यात बातम्या- 

‘मुंबईकरांनो घरातून बाहेर पडू नका’; किशोरी पेडणेकरांनी जोडले हात

…अन्यथा देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहील- संजय राऊत

लता मंगेशकरांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली ‘इतक्या’ लाखांची मदत

‘भारतातील परिस्थिती अतिशय गंभीर’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी जॉन अब्राहम आला धावून; उचललं हे मोठं पाऊल

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More