कोलकाताच्या सुनील नारायणच्या नावे आयपीएलचा नवा विक्रम

Photo- BCCI

बंगळुरु | बंगळुरुविरुद्ध मिळवलेल्या विजयाने कोलकात्याचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला, मात्र या सामन्यात कोलकात्याचा अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणने अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक केलं. हे आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं. यापूर्वी हा विक्रम कोलकात्याच्याच यूसूफ पठाणच्या नावावर आहे, त्यानेही १५ चेंडूत अर्धशतक ठोकलंय.

नारायण आणि पठाण यांच्या पाठोपाठ या विक्रमात सुरेश रैना (१६चेंडू), ख्रिस गेल (१७चेंडू), अॅडम गिलख्रिस्ट (१७चेंडू) यांचा नंबर लागतो. 

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या