बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अथिया-राहुलच्या नात्यावर सुनील शेट्टीनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

मुंबई | बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी क्रिकेटमधल्या खेळांडूंशी संसार थाटल्याचं दिसून येत असतं. यातच बऱ्याच काळापासून बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के. एल. राहुल यांच्या अफेअर्सच्या चर्चा सुरु आहेत. अनेकदा ते एकत्र दिसतात तर फोटोही शेअर करतात. तर आता यावर अभिनेते सुनील शेट्टीनं यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अथिया आणि राहुल सध्या लंडनमध्ये एकत्र आहेत. आता सुनील यांनीदेखील त्याच्या मुलीच्या रिलेशनबाबत सकारात्मक मत व्यक्त केले आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्यावर सुनील यांनी जणू शिक्कामोर्तबच केले आहे.

सुनील शेट्टी यांनी नुकतीच बॉम्बे टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी सुनील यांना अथिया आणि राहुलच्या रिलेशनबद्दल विचारले असता ते म्हणाले की, हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारला तर अधिक उत्तम होईल. हे दोघे एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या जाहिरातीमध्ये काम करत आहेत. मला असं वाटतं की ते दोघे एकत्र चांगले दिसतात. एखाद्या छान जोडप्याप्रमाणेच ते दिसतात ना? त्यानंतर सुनीलने पुढे हसून सांगितलं, जाहिरातीमध्ये हे दोघेजण एकत्र छान दिसतात असे मला वाटते.

दरम्यान, गेल्या महिन्यात राहुल इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी गेला. तेव्हा राहुलने काही ऑफिशिअल कागदपत्रांमध्ये पार्टनर म्हणून अथिया शेट्टीचे नाव लिहिले होते. नियमांनुसार कोणत्याही क्रिकेटपटूला बाहेर जाताना आपल्या पत्नीचे अथवा पार्टनरचे नाव सांगणे बंधनकारक असते. राहुलने तिथे अथियाचे नाव लिहिले. त्यामुळे या दोघांचे रिलेशन देखील ऑफिशिअल झाले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

थोडक्यात बातम्या – 

काॅमेडी किंग जाॅनी लिव्हर लावणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर हजेरी

“ठाकरे सरकार हँग झालंय त्यामुळे निकालाची वेबसाईट ‘हँग’ली तर नवल काय?”

“मोदींनी कौतुक केलं म्हणून योगी सरकारचं अपयश लपत नाही”

“आम्ही वाट पाहतोय सभ्य शेजारी बनून राहण्याची पण आरएसएची विचारसरणी मध्ये आली”

मोदी सरकारनं दिली आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर; खरेदी करणार ‘इतके’ कोटी डोस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More