बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बिघडली, कावेरी रुग्णालयात दाखल

मुंबई | कलाविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. सर्वांचे लाडके सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती गुरुवारी बिघडल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर त्यांना लगेच चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यामुळे सध्या रजनीकांतच्या चाहत्यांना रजनीकांतला नक्की काय झालं आहे याची चिंता लागली आहे.

रजनीकांत नाॅर्मल रुटिन चेकअपसाठी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती थोडीशी ढासळली. त्यानंतर डाॅक्टरांनी रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल होण्यास सांगितलं. मात्र अद्याप त्यांना नेमकं काय झालं हे समोर आलं नाही.

नुकतंच दोन दिवसांपूर्वी रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव पहायला मिळतोय.

दरम्यान, यापूर्वीही रजनीकांत यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी ते हैद्राबादमध्ये होते तेव्हाही त्यांनी प्रकृती खराब झाली होती. त्यांनंतर त्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या –

ख्रिस्तियानो रोनाल्डो आता होणार 6 मुलांचा बाबा, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली बातमी

मुलाच्या सुटकेनंतर शाहरुखचा पहिला फोटो आला समोर

सोशल कनेक्शनच्या नव्या पर्वाला सुरूवात! फेसबुकचं नाव बदललं

“शिवसेनेचं हिंदुत्व नितेश राणेंच्या जन्माच्या अगोदरपासून, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही”

“मला कधी कधी वाटतं मोदी आणि गडकरी यांच्यात स्पर्धा सुरू आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More