बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनावर तयार होणार ‘सुपरव्हॅक्सिन’; सर्व व्हेरिंएटचा नायनाट करणार

नवी दिल्ली | देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे देशात लसीकरण मोहिमेला वेग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. लसीकरण अभियानात प्रामुख्याने कोविशिल्डचा वापर होत आहे. तर काही ठिकाणी कोवाॅक्सिनचा वापर केला जात आहे. पण लसीकरण केल्यानंतर देखील कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे डोकेदुखी वाढत आहे. त्यामुळे आता जगाला कोरोनावरच्या ठोस उपायाची गरज आहे.

कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून ‘सुपरव्हॅक्सिन’ तयार करण्याचा प्रयत्न वैज्ञानिकांनी सुरू केला आहे. अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक हे संशोधन करत आहेत. कोरोनाचे सर्व प्रकारचे व्हेरिएंट नष्ट करता येतील. तसेच भविष्यात कोणतीही महामारी आल्यास त्याच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यास देखील मदत होईल, अशी सुपरव्हॅक्सिन तयार करण्यात येत आहे.

वैज्ञानिकांकडून सध्या उंदरांवर या लसीची चाचणी केली जात आहे. त्यामुळे कोविड-19 सोबतच इतर सर्व प्रकारांवर प्रभावी ठरू शकेल अशा प्रकारच्या सुपरव्हॅक्सिनची निर्मिती केली जात आहे. या लसीला ‘सेकंड जनरेशन’ असं संबोधण्यात येत आहे. उंदरांवर करण्यात आलेल्या चाचणीत अँटीबाॅडी तयार होत आहे का हे तपासण्यात येईल. त्यानंतर त्याची मानवी चाचणी होणार आहे.

दरम्यान, उंदरांमध्ये अँटीबाॅडीज तयार होत असल्याचं दिसून येत आहे. यात स्पाइक प्रोटीनचा सामना करू शकेल अशा अँटीबाॅडीज तयार झाल्याचं निष्पन्न झालं आहे. पुढील वर्षात याची मानवी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनावर प्रभावी उपाय जगभरात वापरता येऊ शकतो.

थोडक्यात बातम्या-

भारताला पराभूत करत कसोटी क्रिकेटच्या पहिल्या विश्वचषकावर न्युझीलंडने कोरलं नाव

मोठी बातमी! डेल्टा प्लस कोरोनानं घेतला पहिला बळी

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत घट, वाचा आजची आकडेवारी

“शरद पवारांना भेटलो, ते म्हणाले उद्धव ठाकरे 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करतील”

कौतुकास्पद! भर पावसात जेसीबी चालकाची माणुसकी, पाहा व्हिडीओ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More