दिवाळीत फटाके फोडण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी; मात्र या वेळेतच फोडण्याची अट

नवी दिल्ली |  देशात फटाक्यांच्या विक्रीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. कमी प्रदुषण करणारे आणि परवानाधारक विक्रेत्यांनीच फटक्याची विक्री करावी, असं न्यायालयानं सांगितलं आहे.

देशात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वौच्च न्यायावयाने निकाल दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने फटाके विक्रीला परवानगी दिली असली तरी रात्री 8 ते 10 या वेळेतेच फटाके वाजवावेत असंही न्यायालयाने म्हटलं आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारने सरसकट फटाके बंदीला विरोध दर्शवला आहे. त्याऐवजी मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घालावी, अशी मागणी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-कर्मचाऱ्यांकडूनच ‘पेटीएम’चा डेटा चोरी; कंपनीकडे 20 कोटींची मागणी

-देशभरात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी?; सर्वोच्च न्यायालय आज देणार निर्णय

-…नाहीतर मराठा समाज पुन्हा आक्रमक होईल; मराठ्यांचा इशारा  

-शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपची नवी रणनीती?

-‘एमआयएम’नंतर आता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध!  

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या