सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिवसेना संतप्त, शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया समोर
मुंबई | शिवसेनेत बंडखोरी करत शिंदे गटात गेलेल्या 16 आमदारांवर शिवसेनेने अपात्रतेची कारवाई केली होती. या निर्णयाला आव्हान देत शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांना दिलासा देत या याचिकेवर आजची तारीख दिली होती. त्यानंतर आजच्या कामकाजात हा विषय नाही म्हणून आजचा निकाल लांबणीवर पडला. आज न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांना कोणतेही निर्णय न घेण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिंदे गटतील 16 आमदारांना दिलासा मिळाला आहे. शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी या याचिकेवर सुनावणीची मागणी न्यायालयाकडे केली असता, न्यायालयाने हे निर्देश दिले. न्यायालयाच्या या आदेशावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधाला. सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) हे अपेक्षीत नाही म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) जे संविधान (Constitution) दिले त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम सध्या सुरु आहे. कायद्याची पायमल्ली होत असताना सर्वोच्च न्यायालय आणि सर्वचजन शांत आहेत. अध्यक्षांनी निर्णय घेऊ नये, या आदेशामुळे न्यायालयाने कोणाला दिलासा दिला आहे? असे अरविंद सावंत म्हणाले.
बेकायदेशीरपणे निर्माण झालेल्या सरकारला ज्याप्रकारे संरक्षण दिले जाते आहे, न्यायालयाकडून वेळकाढूपणा केला जातो आहे. न्याय देण्यास उशीर करणे, हे सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षित नाही. आम्ही न्यायालयाकडे मोठ्या आशेने पाहत आहोत. आमच्याकडे शिवसेना म्हणून पाहू नका. पण देशाच्या संविधानाच्या पायावर घाव घातला जात आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal Pradesh) देखील असेच घडले होते, असंही सावंत म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
पर्यटनासाठी जाणार असाल तर जरा थांबा, ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका, देशमुखांच्या जामीनाला आणखी एकदा नकार
शिंदे गट विरूद्ध शिवसेनेच्या न्यायालयीन लढाईवरून संजय राऊत आक्रमक, म्हणाले…
बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्या यू-टर्ननंतर उद्धव ठाकरे आक्रमक, केली ‘ही’ मोठी कारवाई
गोव्याच्या राजकीय वातावरणात बिघाड, सोनिया गांधींनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
Comments are closed.