बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केंद्र सरकार आपल्या कर्तव्यात चुकल्यामुळेच ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलं”

उस्मानाबाद | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण नाकारल्यापासून राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाची खेळी सुरू असते. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकार आपल्या कर्तव्यात चुकल्यामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलं, असं म्हणत जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आज जयंत पाटील यांनी उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

मी ज्यावेळी ग्राम विकासमंत्री होतो तेव्हा 2011-2012 साली जे सर्वेक्षण करण्यात आलं.  त्यावेळी आम्ही ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून जे सर्वेक्षण केलं. ते आम्ही केंद्राला पाठवलं होतं. ते आधिकृतपणे केंद्राने पब्लिश केलं पाहिजे होतं, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकारकडे हे सगळे आकडे असताना देखील, त्यांनी ते सुप्रिम कोर्टोत दाखल केलं नसल्यामुळे कोर्टाने हा निर्णय दिला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही झालं तरी ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून देऊ, असा महाराष्ट्र सरकारचा निर्धार असल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांना दिलासा नाहीच; सोमवारपासून ‘हे’ निर्बंध लागू

पुणेकरांसाठी खुशखबर! बहुप्रतिक्षीत ‘स्पुटनिक वी’ लस ‘या’ तारखेपासून मिळणार

“शरद पवारांचं महत्व वाढवण्याची काय गरज, पवारांचा सल्ला मोदीही घेतात”

“पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं वागणं मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा देणारं”

‘झेपत नसेल तर राजीनामा द्या’; खासदार सुप्रिया सुळेंनी मुरलीधर मोहोळ यांना सुनावलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More